मा. सचिव साहेबांचा संदेश

ग्रामीण भागातील बहुजन समाजातील शेतकरी कष्टकरी यांची मुले व मुली शिक्षणापसून वंचित राहु नयेत म्हणुन 1998 साली माऊली विद्यापीठ, केजच्या संस्थापक मा. खासदार सौ.रजनीताई पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.श्री.अशोकरावी पाटील साहेब यांनी नेकनूर येथे प्रमिलादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना केली व शैक्षणिक विस्तार वाढविला व तेच व्रत सेवाभावी वृत्तीने मी पार पाडण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहे.

आजतागायत महाविद्यालयाने 24 वर्ष पूर्ण केलेली असून (रौप्य महोत्सवी) 25 व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. सतत प्रगतीकडे वाटचाल करण्याचाच प्रयत्न केलेला आहे.

 ग्रामीण भागातील वंचित घटकांची ज्ञानाची भूख भागवली जावी हाच त्यामागील प्रमुख उद्येश आहे.

आतापर्यंत या महाविद्यालयातून कला व विज्ञान शाखेतून बाहेर पडलेल्या बहुतांशी विद्यार्थी पोलीस, शिक्षक, प्राध्यापक, बँक, आरोग्य विभाग, विद्युत मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वकील, पत्रकारिता, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य इत्यादीसारख्या समाजिक राजनैतिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यामधून महाविद्यालयाचे नांव उंचावताना दिसुन येत आहे.

या महाविद्यालयाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला असून संस्थेने महाविद्यालयाला अद्ययावत इमारत, सुसज्जप्रयोगशाळा, यंत्र सामुग्री, ग्रंथालय, मुलीचे वसतिगृह, भव्य क्रीडागंण, प्रशिक्षित प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपलब्ध करुन दिलेले आहेत. भविष्यात ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांची गरज ओळखून महाविद्यालयात नवनवीन पदविका अभ्यासक्रम सुरु करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यातुन विद्यार्थी स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहु शकतील, असा मला विश्वास वाटतो.

विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने महाविद्यालयामधील प्राचार्य, सर्व प्राध्यापक आपल्या मदतीला सदैव तत्पर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामधून निश्चितच आपण विविध क्षेत्रामध्ये यशस्वी व्हाल आणि महाविद्यालयाची प्रतिमा आणखी उंचवाल एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो.

 सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना या निमित्ताने शुभेच्छा.

                                                                                                                           मा. सचिव