प्राचार्यांचे मनोगत
प्रिय विद्यार्थी – विद्यार्थिनी मित्रहो,

प्रथमत इयत्ता १०वी आणि १२वी कला व विज्ञान शाखांमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.

२० मार्च २०२० पासून आपण सर्वजण कोरोना विषाणूच्या छायेखाली कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाइन पद्धतीने एकमेकांच्या संपर्कात आहोत. कोरोनाविषाणू ने शिक्षण क्षेत्राची सर्व घडी विस्कळीत करून टाकलेली आहे अशाही परिस्थितीमध्ये आपण एकमेकांच्या संपर्कात WhatsApp Group च्या माध्यमातून आचार विचारांचे आदान-प्रदान करत राहिलो ही एक जमेची बाजू मानता येईल.

आपल्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आणि आपले प्रेरणास्थान खासदार श्रीमती रजनीताई पाटील संस्थेचे अध्यक्ष आणि आपले स्फूर्तीस्थान मा. मंत्री श्री. अशोकरावजी पाटील साहेब आणि सातत्याने आपणाला मार्गदर्शन करणारे संस्थेचे सचिव श्री. आदित्यदादा पाटील साहेब या सर्वांच्या सहकार्याने हे सर्व शक्य होऊ शकले.

कोरोना  संकटाच्या प्रादुर्भाव जसा जसा कमी होत गेला त्या पद्धतीने महाराष्ट्र शासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शक सूचना आणि परिपत्रकानुसार आतापर्यंत महाविद्यालयाने दमदार वाटचाल केलेली आहे व यापुढील काळात ही आपणा सर्वांच्या सहकार्याने करीत राहणार आहोत. महाविद्यालयामध्ये कनिष्ठ विद्याशाखे अंतर्गत कला व विज्ञान विद्या शाखा आणि वरिष्ठ विद्याशाखेत अंतर्गत कला व विज्ञान विद्याशाखा या दोन्ही विद्याशाखा सर्व सोयींनी आपल्या साठी उपलब्ध आहे. प्रवेशाची संख्या मर्यादित असल्यामुळे सर्वांनी आपले प्रवेश निश्चित करून घ्यावेत महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग सतत आपल्या सेवेसाठी उपलब्ध असून सुसज्ज ग्रंथालय आपल्यासाठी खुले आहे.

विविध प्रकारच्या खेळासाठी महाविद्यालयाचे भव्य प्रांगण उपलब्ध असून आपण सर्वजण त्याच्या लाभ घ्याल अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करतो. महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत. येणाऱ्या 2022-23 आणि त्या पुढील काळामध्ये ही आपण सर्वजण मिळून कोरोना सारख्या संकटाला हरवू या आणि शिक्षणाची विस्कळीत झालेली घडी पुन्हा पूर्वपदावर आणू यात एवढेच यानिमित्ताने आपल्याशी हितगूज करतो.

पुन्हा एकदा महाविद्यालय परिसरामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा

प्राचार्य